डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचं निधन

नाशिकच्या दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचं आज अल्प आजारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक जिल्हा सहकारी बँक, सिन्नर व्यापारी बँक, कुसूमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांमधे त्यांनी पदं भूषवली असून या संस्था वाढवण्यात त्यांचा मेालाचा सहभाग होता.

 

अखिल भारतीय लघु उद्योग महासंघाचे ते माजी अध्यक्ष होते. आज संध्याकाळी सातपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा