डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सक्तवसुली संचालनालयाचे अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयानं आज अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे टाकून साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत असलेल्या खात्यांद्वारे करण्यात आलेल्या डेबिट व्यवहारांच्या तपासात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं आढळलं आहे. तसचं विविध डमी संस्थांच्या खात्यातून शेकडो कोटी रुपयांची रोकड काढून ती अहमदाबाद, मुंबई आणि सुरत इथं हवाला ऑपरेटर्सना वाटण्यात आली. नोव्हेंबरमध्ये नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेवर या प्रकरणात टाकलेल्या छाप्यांच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा