सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन अॅक्टअंतर्गत ‘महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार्थ तस्कर’ म्हणूनही त्याची नोंद आहे. पी एम एल ए कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. दुबईत राहणारा जसमीत भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालवत असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
Site Admin | August 30, 2024 10:49 AM | ED | ईडी
अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे देशभरात दहा ठिकाणी छापे
