दिल्लीत आजपासून भारत ऊर्जा सप्ताह 2025 चा प्रारंभ होत आहे. येत्या शुक्रवार पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या चार दिवसांमध्ये मंत्रीस्तरीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभाग, प्रदर्शनाची जागा आणि आयोजित केली जाणारी सत्रे यांची संख्या पाहता हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल. देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड यांची दालने असतील.