कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे. ज्या सदस्यांचे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधारकार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत, असे सदस्य त्यांच्या प्राेफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिल अथवा आईचं नाव, रुजू झाल्याचा दिनांक, समाप्ती दिनांक आदी तपशील कुठल्याही कागदपत्रांशिवाय अपलोड करू शकतात. या सुविधेचा लाभ ३ लाख ९० हजार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी धारकांना होणार असल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे.
Site Admin | January 19, 2025 8:30 PM | EPFO
EPFOच्या सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ
