रोजगार आधारित लाभ योजना अर्थात इएलआय योजना युद्धपातळीवर राबवावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल याची खबरदारी घेण्यासाठी मजबूत यंत्रणा उभारावी असे आदेश केंद्रिय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. सर्वसमावेशक आणि शाश्वत रोजगारनिर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी या योजनेसंदर्भातल्या बैठकीत सांगितलं.
रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल तसंच नोकरी करणारे आणि नोकरी देणारे दोघांनाही लाभ होईल अशा रितीनं ही योजना आखण्यात आल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा कारंदळजे, मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.