डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातल्या संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यानी दिल्या.

 

तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींच्या उपजीविकेसाठी बांबू, केळी, फणस अशी झाडं लावावीत. हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांच्या बाजूनं कुंपण घालावं, तसंच हत्तींना रेडिओ कॉलर लावून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा