जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला कालपासून सुरुवात झाली. राज्यात पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतल्या विविध तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरस्थ माध्यमातून या मोहिमेचं उद्घाटन केलं. या मोहिमेअंतर्गत दोन वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना प्रतिबंधक गोळ्यांचा डोस देण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना डी. ई. सी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टीन या तीन औषधांची मात्रा उंची आणि वयोगटानुसार देण्यात येत आहे. काल पहिल्याच दिवशी 18 हजार 321 नागरिकांना हत्तीरोग निर्मूलन औषधाची मात्रा देण्यात आली.
Site Admin | February 11, 2025 9:41 AM | औषधोपचार मोहीम | राज्य | हत्तीरोग
राज्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात
