अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी निवडणुक होत असून, डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये लढत होणार आहे. हॅरिस यांनी काल नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन इथे प्रचार केला तर ट्रम्प यांनी बुधवारी विस्कॉन्सिन इथे प्रचार दौरा केला.
आत्तापर्यंत 5 कोटी 75 लाख अमेरिकी नागरिकांनी मतदान केंद्रांवर जाऊन किंवा ई मेलद्वारे मतदान केलं आहे. असून हजारो लोक मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान करत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कॅरोलिना, जॉर्जिया, मिशिगन आणि नेवाडा यासह 7 प्रमुख राज्यांमधल्या मतदारांवर अंतिम निकाल ठरणार आहे. अमेरिकेत 24 कोटी 40 लाख नोंदणीकृत मतदार असून 2020 च्या निवडणुकीत सुमारे 66 टक्के मतदान झालं होतं.