केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली असून हरियाणात आता १ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिष्णोई समाजाच्या असोज अमावस्या उत्सावामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी ही तारीख बदलण्याची विनंती केली होती. याबरोबरच जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता ४ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबरला करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
Site Admin | August 31, 2024 7:58 PM | Election Commission | Haryana Assembly polls
हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभेसाठी ४ ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी
