श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्याच्या अखेरीस निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. सभागृह नेते बिमल रथनायके यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पक्षनेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आर्थिक संकटामुळे मार्च २०२२ पासून ३४० स्थानिक परिषदांच्या ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी नगरसेवक निवडीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयानं यावर्षी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाला स्थगित करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीनं घेण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
Site Admin | December 2, 2024 1:35 PM | Election Commission of Sri Lanka