महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासंदर्भात संबंधित विभागांचे आणि कार्यालयांचे अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत. ३१ जुलै २०२४ रोजी मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आजतागायत तीन स्मरणपत्रे देऊनही कोणताही अहवाल सादर प्राप्त झालेला नाही, असं या पत्रात म्हटलं आहे.
Site Admin | September 27, 2024 7:03 PM | Election Commission of India
अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश
