राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यापक अभियान नुकतंच राबवलं. २५ दिवसांच्या या अभियानात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या २८ हजार प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या ४ हजार ७१९ बैठका झाल्या. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या बैठकांचे अहवाल मागवण्यात आले आहेत.
Site Admin | April 1, 2025 3:20 PM | अभियान | निवडणूक आयोग
राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलं व्यापक अभियान
