डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हरियाणा विधानसभा निवडणुकीची तसंच जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू काश्मीरच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसंच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली.  

जम्मू काश्मीरचा तिसरा टप्पा आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर असून १६ तारखेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊन शकतील. तर जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जम्मू काश्मीर मध्ये १८ सप्टेंबर,   २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं  लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६ ए अंतर्गत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांदरम्यान कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे.  

हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होईल.हरयाणामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. 

 दोन्ही निवडणुकांची मतमोजणी ८ऑक्टोबरला होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा