झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांचे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बोकारो इथं सभा घेत असून गढवा इथंही त्यांची प्रचारसभा होणार आहे, तर रांची मधे ते रोड शो करणार आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान प्रत्येकी तीन सभा घेणार आहेत, तर भाजपचे झारखंड निवडणूक सहप्रभारी हिमंत बिस्वा सरमा चतरा आणि लातेहार इथं प्रचारसभा घेणार आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज भवनाथपूर, तमार आणि खिजरी इथं सभा घेणार आहेत, तर राजदचे ज्येष्ठ नेते तेजस्वी यादव चतरा मधे हंटरगंज इथं प्रचारसभेला संबोधित करणार आहेत.
झारखंडमधे पहिल्या टप्प्यासाठी येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याकरता प्रचाराची मुदत उद्या संध्याकाळी संपेल.