डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून चोख बंदोबस्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्याविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. राजधानीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी अनेक भागात छापे टाकले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी ३० हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या २२० तुकड्या दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुक सुरळीत पार पाडण्यात सहभागी असलेल्या मतदान अधिकारी, सुरक्षा दल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. दिल्लीत न्यू मोती बाग इथं मतदान केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा