डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 21, 2024 7:24 PM | Eknath Shinde

printer

मार्चपर्यंत राज्याला नक्षलवादमुक्त करण्याचा मानस – एकनाथ शिंदे

राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी महायुतीचं सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली. ते आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. 

 

महायुतीच्या काळात गुन्हे उघडकीला येण्याचे प्रमाण वाढले, विकास आणि कल्याणकारी योजनांना वेग मिळाला, विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार आणि सिंचनाच्या सुविधा वाढल्या असं ते म्हणाले. 

 

मुंबईत दादर इथं इंदूमील मधल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम ६ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असेल, असं त्यांनी सांगितलं. 

 

मार्च २०२५ पर्यत नक्षलवादाचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गडचिरोलीसारख्या भागात विविध प्रकल्प आले, रोजगार आले त्यामुळे या भागापर्यंत विकास पोहोचला, परिणामी येथील जनतेची मानसिकता बदलली ते मूळ प्रवाहात आले, असं शिंदे यांनी सांगितलं. राज्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रादेशिक समतोल राखत सिंचन क्षेत्र वाढवलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा