प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरु केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे सात हजार झाडं लावली आहेत. देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभियानात योगदान द्यायला सुरुवात केली. कालपासून सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा अभियानातही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमधे वृक्षलागवडीचं काम हाती घेतलं आहे.
Site Admin | September 18, 2024 1:27 PM | Ek Ped Maa Ke Naam
‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सात हजार झाडं लावली
