छत्तीसगड मधल्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात आठ सुरक्षा सैनिक आणि चालक ठार झाले. पंधरा जणांच्या जिल्हा राखीव रक्षक दलाची तुकडी, संयुक्त कारवाईनंतर काल दंतेवाडा इथून वाहनानं परतत असताना कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवर गोळीबार सुरू केला. या घटनेत पाच सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.