डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून चौदा जणांना सोडण्यात आलं आहे, तर 69 भारतीय नागरिक रशियन सैन्यातून सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती काल परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणी सीबीआयनं 19 व्यक्ती आणि संस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल केला असून, 10 मानवी तस्करांविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले आहेत. तपासादरम्यान एप्रिलमध्ये दोघा आरोपींना तर मे महिन्यात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, असंही जयशंकर यांनी सांगितलं. सायबर घोटाळ्यांबाबत दक्षिण पूर्व आशियामध्ये काम करण्यासाठी लोकांची दिशाभूल केली जात असल्याबद्दल भारत सरकारनं राजकीय पातळीवर सर्व संबंधित देशांच्या सरकारांसोबत हा मुद्दा लावून धरला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत कंबोडियातून 650, म्यानमारमधून 450 आणि लाओसमधून 548 भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आलं असून सरकार याबाबत अधिक सतर्क असल्याचंही जयशंकर म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा