छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार झाले. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. गंगलूर भागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळताच जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त दलानं ही माओवादीविरोधी मोहीम राबवली.
Site Admin | February 1, 2025 8:31 PM | Chattisgarh
छत्तीसगडमधे संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार
