देशात अनेक ठिकाणी आज ईद – ए – मिलाद – उन – नबी म्हणजेच प्रेषित मोहम्मद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
प्रेषित हजरत मोहम्मदांची मानवता आणि बंधुभावाची शिकवण निरंतर जगाला मार्गदर्शन करीत राहील असं उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.या सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंद, समृद्धी, एकोपा आणि सामंजस्याचं दर्शन घडावं, अशी शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.