सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याने अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गाने पर्यटकांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.
मुख्यमंत्री प्रेसिंग तमांग यांनी मेल्लीबाजारला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. तसंच पाटबंधारे विभागाशी प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चाही केली. पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी पूरनियंत्रण भिंत बांधणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितलं आहे. सिक्किममधले रस्ते आणि पूल विभाग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यादरम्यान काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत, राष्ट्रीय महामार्ग दहावर येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करण्यात आली.