मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना १० हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असेल.
पालघर जिल्ह्यातल्या उमेदवारासांठी १२ ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.
उमेदवारांना https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.