केंद्र सरकार कोणावरही कोणतीही भाषा लादत नसून तमिळनाडू सरकार त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. ते आज संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणाशी सहमत असल्यास तमिळनाडूला पीएम श्री शिक्षण निधी वाटप द्यायला कोणताही आक्षेप नसल्याचंही ते म्हणाले. विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या कर्नाटक आणि पंजाब सरकारमध्ये देखील पीएम श्री शिक्षण निधी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू आहेत, असंही प्रधान म्हणाले.
Site Admin | March 10, 2025 7:15 PM | Education Minister Dharmendra Pradhan
केंद्र सरकार कोणावरही कोणतीही भाषा लादत नाही-धर्मेंद्र प्रधान
