पीएम श्री योजनेअंतर्गत ६२० जवाहर नवोदय विद्यालये विकसित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज दिली. या अंतर्गत सध्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल. गेल्या पाच वर्षांत जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे, असं लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
Site Admin | December 16, 2024 7:54 PM | Education Minister Dharmendra Pradhan