सरकार सर्व भारतीय भाषांमध्ये सुलभ आणि सोयीस्कर शिक्षणाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सांगितलं. त्यांनी आज नवी दिल्लीत प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चामू कृष्ण शास्त्री आणि यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि शिक्षण मंत्रालयाचे अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Site Admin | October 18, 2024 8:09 PM | #केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान