मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओडीशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलं. केवळ ‘रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण’ हे ब्रीद न ठेवता, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन केलं पाहिजे असं त्या पुढे म्हणाल्या. मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल संवाद साधला. देशातील मुली अधिक मेहनती आहेत आणि वेगाने प्रगती करत असून, देशाच्या प्रगतीचा त्यांच्या विकासाशी जवळचा संबंध आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.