शिक्षणात गुंतवणूक हा समाजसेवेचा सर्वात प्रभावी मार्ग आहे कारण यामुळे मनुष्यबळ समृद्ध होऊन वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुरक्षित राहतं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या चौथ्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान देणं आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. जगात अनेक अग्रगण्य शिक्षणसंस्था त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाश्वत पाठिंब्यावर आणि उत्साहाच्या बळावर भरभराट करताना दिसत आहेत असं त्यांनी म्हटलं.
Site Admin | November 9, 2024 8:10 PM | Jagdeep Dhankhad
शिक्षणाकडे व्यापार म्हणून पाहू नये तर शिक्षणासाठी योगदान देणं आपलं कर्तव्य आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
