सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४,९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख रुपयांची बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत तसंच स्थावर मालमत्ता बळकावण्यासंदर्भातही पुरावे सापडले आहेत. बँक ऑफ बडोदाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ही कारवाई केली जात आहे.
Site Admin | January 5, 2025 1:39 PM | Delhi | ED raids | Mumbai
कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीत ईडीचे छापे
