डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हैदराबाद क्रिकेट असोसिएशन संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणी मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आज माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स बजावलं. अझरुद्दीनवर आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. उप्पल इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानासाठी डिझेल जनरेटर आणि अग्निशमन यंत्रणेच्या खरेदीमध्ये २० कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीकडे दाखल झाली होती. त्या तक्रारीनंतर गेल्या वर्षी ईडीने तेलंगणात नऊ ठिकाणी छापेमारी केली होती. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा