डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 18, 2024 2:53 PM | ED raids

printer

बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात छापा टाकला. १ हजार ३९२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी ईडीने १५ ठिकाणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात हरियाणामधल्या महेंद्रगडचे आमदार रावदान सिंह यांच्याविरोधात आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही कारवाई केली आहे.

 

मेसर्स अलाइड स्ट्रिप्स लिमिटेड या कंपनीच्या नावे १ हजार ३९२ कोटी रुपयांचं घेतलेलं कर्ज बुडवण्यात आलं होतं. या कंपनीशी रावदान सिंह यांचा संबंध असल्याचं ईडीच्या तपासात आढळून आलं आहे. या प्रकरणाचा तपास ईडीसह सीबीआय करत असून ही कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा