बनावट दारु प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीनं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर आज छापे टाकले आहेत. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील १४ ठिकाणी ईडी तपास करत आहे. भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्यासह त्याचा सहकारी लक्ष्मी नारायण बन्सल आणि काही इतरांवर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार ईडीनं छापे टाकले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या चौकशीअंतर्गत, ईडीनं आतापर्यंत विविध आरोपींची सुमारे २०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
Site Admin | March 10, 2025 1:29 PM | ED raids
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचे छापे
