नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली १९ ब्रोकिंग संस्था आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध ईडीने खटला दाखल केला आहे. विशेष मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केल्याचा तसंच बेकायदेशीररित्या मिळालेली दलालीची रक्कम व्यवसायात गुंतवल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी ईडीने ३४ कोटी ७४ लाख रुपयांची दलालीची रक्कम तसंच, ३ हजार २८८ कोटी ७६ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.
Site Admin | February 5, 2025 7:25 PM | ED
नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली १९ ब्रोकिंग संस्था आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध ईडीकडून खटला दाखल
