उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात जमीन, वास्तू आणि बँक खात्यांमधल्या मुदत ठेवींचा समावेश आहे. १ हजार ४३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या फसवणूक प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. उषदेव इंटरनॅशनलनं अनेक बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेली रक्कम इतर संस्थांना असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात दिली, आणि शेवटी ती भारतातल्या कंपन्यांकडे गेल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं. या भारतातल्या कंपन्यांचे प्रमुख भागधारक उषदेव इंटरनॅशनलच्याच परदेशी सहायक कंपन्या आहेत.
Site Admin | September 12, 2024 3:25 PM | ED
उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई
