बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाची सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या विविध ठिकाणाहून जप्त केल्या आहेत. त्यात बँकेतली रोकड, म्युच्युअल फंड, समभाग, भूखंड आणि कंपनी यांचा समावेश आहे. विविध बँकांना मिळून सुमारे चार हजार सात कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई ईडीने केली आहे.
Site Admin | October 28, 2024 6:44 PM | ईडी