२०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२५ साठी चलनफुगवट्याचा दर साडे चार टक्के आणि आर्थिक वर्ष २०२६ साठी चलनफुगवट्याचा दर ४ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.