मतदानासाठी बायोमॅट्रीक ऑथेंटिकेशन पद्धतीमुळं मतदानातल्या गैरप्रकारांना आळा बसेल, असं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे . ते नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. याबरोबरच रिमोट मतदान सुविधेमुळं मतदार कुठुनही कुठेही मतदान करू शकेल, मतदार वयस्कर, अपंग अथवा परदेशात असला तरी या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. या परिषदेत विविध इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रणांसंबधी चर्चा झाली असून मतदार प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
Site Admin | January 24, 2025 8:47 PM | ECISVEEP