आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर गेलं आहे. या पथकात निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाचं पथक विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत रांची इथं बैठक घेत आहे. भाजपा, काँग्रेस आणि माकप या राष्ट्रीय पक्षांसह झारखंड मुक्ती मोर्चा, राजद आणि आजसू हे प्रादेशिक पक्ष आपली मतं निवडणूक आयोगापुढे मांडत आहेत. यानंतर निवडणूक आयोगाचं पथक अंमलबजावणी संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. त्यानंतर आयोगाचं पथक राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, पोलीस नोडल अधिकारी आदींशी चर्चा करतील.
निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग,सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार आहे.