डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयाने जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे. नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत नवीन आयुक्तांची नेमणूक लांबणीवर टाकावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी बैठकीत मांडली.

 

ज्ञानेश कुमार भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८च्या तुकडीतले केरळ कॅडरचे अधिकारी असून त्यांच्याकडे केरळ राज्यशासन तसंच संरक्षण, संसदीय कार्य, आणि सहकार मंत्रालयात काम करण्याचा अनुभव आहे. देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते उद्या कार्यभार स्वीकारतील.  ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज सेवा निवृत्त होत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या जागी वरिष्ठ  प्रशासकीय अधिकारी विवेक जोशी यांची नेमणूक झाली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८९च्या तुकडीतले हरयाणा केडरचे अधिकारी आहेत. त्यांचा कार्यकाळ २०३१ पर्यंत असेल. आयोगाचे तिसरे सदस्य म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष सुशील चंद्रा यांची यापूर्वीच नेमणूक झाली आहे.

 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालय  उद्या तातडीनं सुनावणी घेणार आहे. हा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती समितीने नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक जाहीर केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयात दिली. तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांनी उद्या तातडीने सुनावणी घेऊ असं सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा