डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 30, 2025 5:26 PM | Arvind Kejriwal

printer

ECI : विषारी पदार्थ नदीत प्रवाहित केल्याच्या आरोपासंदर्भात अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरण

हरयाणा सरकारने यमुना नदीत जाणीवपूर्वक विषारी पदार्थ प्रवाहित केल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. हरयाणा सरकारने विषारी पदार्थ प्रवाहित केल्यामुळे यमुनेच्या पाण्यातली अमोनियाची पातळी वाढली आणि पाणी विषारी झालं, अशी तक्रार केजरीवाल यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर केजरीवाल यांनी उद्या सकाळपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. केजरीवाल यांनी सरसकट आरोप न करू नयेत. हरयाणा सरकारने यमुनेत कोणता विषारी पदार्थ मिसळला, तो किती प्रमाणात होता, तसंच दिल्ली जल बोर्डाच्या कोणत्या अभियंत्याने पाणी विषारी झाल्याचा शोध लावला, याविषयी मुद्देसूद स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही आयोगाने केजरीवाल यांना दिले आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा