महाराष्ट्र आणि झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन होत नसल्याच्या तक्रारी भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांविरोधात दाखल केल्यानंतर आज निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या. सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही पक्षांनी याबद्दल प्रतिसाद द्यावा, असं आयोगानं नोटिशीत म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी २२ मे रोजी जारी केलेल्या सूचनांचं पालन करून दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारक आणि नेत्यांनी प्रचारादरम्यान सभ्यतेचं पालन करावं असंही या नोटिशीत म्हटलं आहे.
Site Admin | November 16, 2024 6:34 PM | BJP | Congress | ECI