जपानमध्ये आज सकाळी पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हाभूकंप काल मध्यरात्री 1 वाजून 32 मिनिटांनी झाला. भूकंपाचं केंद्र पश्चिमओगासावारा बेटांवर 530 किलोमीटर खोलीवर, 27 पूर्णांक1 दशांश अंश उत्तर अक्षांश आणि 139 अंशपूर्व रेखांशावर होतं. या भूकंपामुळेत्सुनामीचा धोका नसून कोणीही जखमी झाल्याचं किंवा कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्तनाही असं जपानच्या स्थानिक हवामान संस्थेनं म्हटलं आहे.
Site Admin | July 9, 2024 11:15 AM | ओगासावारा बेट | जपान | भूकंप