चीनच्या पश्चिम भाग, तिबेटमध्ये झालेल्या भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून गोठवणाऱ्या थंडीतही शोधमोहिम सुरु आहे. शिगात्से भागातल्या सुमारे साडे तीन हजारांहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक दशांश रिक्टर स्केल इतकी होती. दरम्यान, चिनी अधिकाऱ्यांनी अद्याप बेपत्ता लोकांची कोणतीही आकडेवारी दिलेली नाही. चीनच्या भूकंपशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपग्रस्त भागात गेल्या २४ तासांत ५१५ धक्के जाणवले आहेत.
Site Admin | January 8, 2025 8:42 PM | China