म्यानमारला आज सलग दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता ७ पूर्णांक ७ दशांश आणि ६ पूर्णांक ४ दशांश रिख्टर स्केल होती. या भूकंपाचं केंद्र सागाइंग इथं होतं.
या धक्क्यांमुळं अनेक इमारती कोसळल्या. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्यानं अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. इथं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.
दरम्यान छत्तीसगढच्याच नारायणपूर जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन बस्तर फायटर्स या सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.