भारतासह नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तान देशांमधल्या अनेक भागात आज सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात, सिलीगुडी आणि पाटणासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पाटणा मध्ये आज पहाटे अडीच वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 इतकी नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र नेपाळ होते. नेपाळमध्ये ६ पूर्णांक १ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
Site Admin | February 28, 2025 3:05 PM | earthquake
भारतासह इतर देशांमध्ये भूकंपाचे धक्के
