बंगालच्या उपसागरात आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ५.१ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले. यामुळे ओदिशातल्या भुवनेश्वर, पुरी, पारादीप, बारीपाडा, संबलपूर, अंगुल आणि बालासोर सारख्या भागांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. हा भूकंप समुद्राच्या पृष्ठभागाखाली ९१ किलोमीटर खोलवर झाला होता. यात कोणतीही जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
Site Admin | February 25, 2025 1:44 PM | Earthquakes
बंगालच्या उपसागरात ५.१ रिक्टर स्केलचा भूकंप
