भारत आज ‘अर्थ अवर’ या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार आहे. दर वर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडे आठ ते साडे नऊ या वेळात ‘अर्थ अवर’चं आयोजन केलं जातं. यावेळी जगभरातले नागरिक अनावश्यक विद्युत उपकरणं बंद करतात.
भारतातही सर्व प्रसिद्ध ठिकाणं, स्मारकं, सार्वजनिक- खासगी संस्था, व्यवसाय आणि समुदाय या उपक्रमात एकत्रितपणे सहभागी होतात. यंदा अर्थ अवरमध्ये जल संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी इथं २००७ साली वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) ने द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या सहकार्याने ‘अर्थ अवर’ ची सुरुवात केली होती.