डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठवाडा आणि विदर्भात पहाटे भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता साडेचार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातल्या वाशिम इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

 

दरम्यान, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांत झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा