परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय संबध तसंच क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींवर त्यांचे स्पॅनिश समपदस्थ मॅन्युअल अल्बेरिस यांच्याशी चर्चा करतील. ते स्पॅनिश राजदूतांच्या नवव्या वार्षिक परिषदेलाही ते संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. परराष्ट्रव्यवहार मंत्री म्हणून त्यांची ही स्पेनला पहिलीच भेट आहे.